मुकेश अंबानींच्या विश्वसनीय Right‑Hand प्रकाश शाह यांनी ₹७५ कोटींचा पगार सोडून घेतली दीक्षा

By Prathamesh Suryavanshi

Published on:

PrakashShah vb 04

एकेकाळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे माजी उपाध्यक्ष राहिलेले, मुकेश अंबानींचे विश्वासू, प्रकाश शाह यांनी वार्षिक सुमारे ₹७५ कोटीचा पगार घेणाऱ्या ऐशोआरामातील जीवनाचा त्याग करून दीक्षा स्वीकारली आहे.

PrakashShah vb 04

प्रकाश शाह कोण आहेत?
शिक्षण: केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक + IIT बॉम्बे येथून M.Tech.

कॉर्पोरेट कामगिरी: रिलायन्सच्या जामनगर पेटकोक प्रकल्पात प्रमुख भूमिका, तसेच पेटकोक मार्केटिंग आणि इतर महत्त्वाच्या योजनांत वरिष्ठ सहभाग.

प्रकाश आणि त्यांची पत्नी नैना यांनी महावीर जयंती च्या शुभदिवशी दीक्षा घेतली त्यांच्या या निर्णयाने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसल्याचे दिसून आले. दीक्षा घेऊन त्यांनी सर्व सांसारिक सुखांचा त्याग केला आहे. वेगळे कपडे, चप्पल शिवाय चालणं, भिक्षा यासारख्या जीवनशैलीला अंगीकारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कोविडच्या काळात त्यांनी मोठ्या प्रमाणावर आत्मचिंतन केले तेव्हा त्यांनी बऱ्याच आंतरिक जीवनाचा विचार केला आणि तेव्हा त्यांनी दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या दोनपैकी एका मुलाने आधीच दीक्षा घेतल्याने त्यांना त्यांच्या या निर्णयाला दुजोरा मिळाल्याने दिसून येते.

प्रकाश शाह यांनी श्रीमंत जीवनातून साधु जीवनाकडे वळण्याचा निर्णय घेतून मनुष्याच्या अंतरंगातील शांतता आणि आध्यात्मिकता याकडे लक्ष वेधले आहे. ही घटना अनेकांसाठी प्रेरणादायी बदलाचा प्रेरक ठरू शकते.

Prathamesh Suryavanshi

Research student at Shivaji University, Kolhapur

Leave a Comment