कोल्हापूरच्या महालक्ष्मी अन्नछत्राला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट अन्नछत्र पुरस्कार!

By Prathamesh Suryavanshi

Published on:

WhatsApp Image 2025 06 20 at 11.57.43 PM

“भक्ती परमेश्वराची सेवा मानवाची” हे ब्रीदवाक्य घेऊन महालक्ष्मी अन्नछत्र गेल्या 17 वर्षापासून नित्यनियमाणे भाविकांसाठी मोफत अन्न पुरवण्याची सेवा करत आहेत याचीच दखल घेत कोल्हापूरच्या महालक्ष्मी अन्नछत्राला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट अन्नछत्र पुरस्कार!.

ही अन्नछत्र सेवा ट्रस्टद्वारे २००८ मध्ये सुरू करण्यात आली, ज्याद्वारे लाखो भाविकांना नियमितपणे मोफत भोजन प्रदान केले जाते. उत्सव काळात ही संख्या दहा हजारांपर्यंत वाढते. एकदम स्वच्छ, सुंदर, सात्विक, सुरक्षित व नीटनेटक्या वातावरणात सदर अन्नछत्र स्वादिष्ट व पुरक असे भोजन गेल्या 17 वर्षापासून पुरवत आहेत.


त्यांच्या या कार्याची दखल घेत केंद्र सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासन यांच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय यांच्याकडून सर्वोत्कृष्ट अन्नछत्र असे प्रमाणपत्र दि. 19 जून 2025 रोजी देण्यात आले देण्यात आले.
भारतीय खाद्य सुरक्षा मानक प्राधिकरणाच्या सर्व नियमांचे व अटींचे काटेकोरपणे पालन करून सदर अन्नछत्र चालवले जाते. त्यामुळे केंद्र सरकार कडून महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट अन्नछत्र म्हणजेच भोग प्रमाणपत्र देऊन कोल्हापुरातील महालक्ष्मी अन्नछत्राला सन्मानित केले आहे.
मोफत दंतोपचार व नेत्रोपचार केंद्र, रक्तदान शिबिरे, कुंकुमार्चन, शिवभोजन थाळी योजना, मोफत बस सेवा, धर्मशाळा सुविधा इत्यादी सामाजिक कार्य या ट्रस्ट मार्फत केले जाते.

Prathamesh Suryavanshi

Research student at Shivaji University, Kolhapur

Leave a Comment