कोल्हापुरी चप्पल थेट प्राडा रॅम्पपर्यंत !! श्रेय कुणाचं?

By Kadambari Kadam

Updated on:

walk prada's

walk prada's

कोल्हापुरी चप्पल थेट प्राडा रॅम्पपर्यंत !! श्रेय कुणाचं? कधी वाटलं होतं का की पारंपरिक कोल्हापुरी चप्पल जागतिक फॅशन रॅम्पवर दिसेल? पण आता ते घडतंय! प्राडाने नुकत्याच झालेल्या मिलान फॅशन वीकमध्ये २०२६ च्या स्प्रिंग-समर कलेक्शनमध्ये काहीतरी वेगळं सादर केलं आणि त्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते होतं “प्राडा कोल्हापुरी”!

प्राडाने या शोमध्ये ५६ वेगवेगळे लुक्स सादर केले, ज्यात “दृष्टीकोनातील बदल” आणि “अर्थ व सत्तेचं विघटन” असा संदेश दिला गेला. पण भारतीय प्रेक्षकांसाठी, सर्वात उठून दिसणारं होतं आपली ओळख असलेली कोल्हापुरी चप्पल!

कोल्हापुरी चप्पल म्हणजे महाराष्ट्रातल्या कोल्हापूर या भागात १२व्या-१३व्या शतकात तयार झालेलं हस्तकलेचं प्रतीक. हाताने शिवलेल्या या चामड्याच्या चप्पला केवळ टिकाऊ नाहीत, तर अतिशय आरामदायक आणि पारंपरिक सौंदर्य जपणाऱ्या आहेत. आजही त्या संपूर्ण भारतात लोकप्रिय आहेत.

पण जेव्हा प्राडाच्या या कलेक्शनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, तेव्हा अनेक भारतीयांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली या डिझाईनसाठी भारताला किंवा कोल्हापुरी परंपरेला कुठेच श्रेय देण्यात आलेलं नाही का?

काही जणांना हे गंमतीशीर वाटलं, पण बरेचजण खिन्न झाले. कारण अशा परदेशी ब्रँड्सने भारतातील परंपरेचा आदर राखणं आणि त्याला उचित श्रेय देणं आवश्यक आहे. संस्कृतीचं “इन्स्पिरेशन” घेणं वेगळं, पण त्याचं “क्रेडिट” देणं ही नैतिक जबाबदारी आहे.

आजच्या काळात जेव्हा समावेशकता, सच्चाई आणि पारंपरिक मूल्यांना महत्त्व दिलं जातं, तेव्हा एका साध्या चप्पलवरूनही मोठा चर्चेचा मुद्दा उभा राहू शकतो.

Kadambari Kadam

Research student at Shivaji University, Kolhapur.

Leave a Comment