ChatGPT ने जीव वाचवला: डॉक्टर अयशस्वी ठरले, AI ने आईच्या आजारावर दिला उपाय

By Prathamesh Suryavanshi

Published on:

ChatGPT ने जीव वाचवला डॉक्टर अयशस्वी ठरले, AI ने आईच्या आजारावर दिला उपाय

एका आईचा ChatGPT ने जीव वाचवला! IT क्षेत्रात काम करणाऱ्या मुलीने सोशल मीडियावर एक चमत्कारिक अनुभव शेअर केला आहे. तिच्या आईला तब्बल 1.5 वर्षे सतत खोकला होत होता. देशातील नावाजलेले डॉक्टर, हॉस्पिटल, होमिओपथी, आयुर्वेद, अ‍ॅलोपथी – सर्व काही करूनही फरक पडला नाही. उलट तिची प्रकृती अधिक बिघडली. अंतर्गत रक्तस्त्राव (internal bleeding) सुरू झाला आणि डॉक्टरांनी सांगितले की हे आणखी 6 महिने सुरू राहिले, तर धोका जीवघेणा ठरू शकतो.

ChatGPT ने दिला अचूक सल्ला

ही तरुणी पूर्णपणे घाबरली होती. अखेर ChatGPT वर संपूर्ण माहिती टाकली. AI ने विविध शक्यता दिल्या आणि त्यात एक शक्यता होती – BP ची औषधे. त्यावर ChatGPT ने विचारले, “तुमच्या आईच्या BP औषधात हा घटक आहे का?”

होय! तो घटक त्या औषधात होता. लगेच डॉक्टरांना सांगितले गेले आणि औषधे बदलल्यावर आईची प्रकृती सुधारू लागली.

AI म्हणजे भविष्याचा डॉक्टर?

ही घटना दाखवते की आधुनिक तंत्रज्ञान, विशेषतः AI आधारित ChatGPT, वैद्यकीय सल्ल्यांमध्येही उपयोगी पडू शकतो. डॉक्टरांनी जिथे हात टेकले, तिथे ChatGPT ने मार्ग दाखवला.

म्हणून लक्षात ठेवा – योग्य वापर केल्यास AI ठरू शकतो जीवनरक्षक!

भारतात आरोग्यसेवा क्षेत्रात अनेकदा अचूक निदान मिळत नाही. अशावेळी योग्य माहिती आणि AI चा समजूतदार वापर आपल्याला वेळीच इशारा देऊ शकतो.

Prathamesh Suryavanshi

Research student at Shivaji University, Kolhapur

Leave a Comment