महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या ‘ लाडकी बहिण योजना ‘मुळे राज्यातील कोट्यवधी महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळण्यास सुरुवात झाली होती. परंतु, नुकतीच महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा करत २६.३४ लाख महिलांचा हप्ता थांबवण्याचा निर्णय स्पष्ट केला आहे. या निर्णयामुळे अनेक लाभार्थिनींमध्ये संभ्रम व चिंता निर्माण झाली आहे.
निर्णयामागचं मुख्य कारण
सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की अनेक महिलांनी अपात्र असूनही या योजनेकरिता अर्ज केले आहेत. पात्रतेच्या अटींचा भंग, चुकीची कागदपत्रं, आधार कार्ड लिंकिंग किंवा बँक खात्याच्या तपशीलातील त्रुटी या गोष्टी मुख्य कारणीभूत ठरल्या आहेत. शासनाने अशा अपात्र अर्जदारांना वेळीच इशारा दिला होता की जर आवश्यक दुरुस्त्या केल्या नाहीत, तर हप्ता थांबवला जाईल.
पात्र महिलांसाठी दिलासा
मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं की, “ज्या महिलांनी सर्व कागदपत्रे आणि पात्रता निकष पूर्ण केले आहेत, त्यांना कोणताही अडथळा न करता निधी दिला जात राहील.” म्हणजेच, हे थांबलेले हप्ते केवळ तांत्रिक व पात्रतेशी निगडीत त्रुटीमुळे स्थगित करण्यात आले आहेत.
काय म्हणाल्या अदिती तटकरे?
यावेळी बोलत असताना मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे २६.३४ लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे.
यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे, काही कुटुंबामध्ये २ पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत.
या माहितीच्या आधारे जून २०२५ पासून या २६.३४ लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे २.२५ कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून २०२५ महिन्याचा सन्माननिधी वितरित करण्यात आला आहे.
तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या २६.३४ लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल.
शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल.”
जून महिन्यात सुमारे 2.25 कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. तर जून 2025 पासून या 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे.
यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे, काही कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत. त्यानंतर 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे.
1 thought on “लाडकी बहिण योजना: तब्बल २६.३४ लाख लाभार्थिनींचा निधी बंद होणार – नेमकं कारण काय?”